Vithala Quotes in Marathi | Marathi quotes on vitthal
टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विना ||
माऊली निघाली पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ||
जय जय राम कृष्ण हरी
उभा कमरेवर हात ठेवुनी विठू माझा सावळा…
वाट पाहते वेड्या भक्तांची कधी घडेल वारकरी सोहळा..
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानभूक हरली रे. प्रबोधिनी भागवत एकादशी शुभेच्छा
दिसेना वैष्णवांचा ताफा, वाट पाहतात वाटा सुन्या-सुन्या पंढरीत, विठू पडला एकटा..|
वाहते चंद्रभागा त्याच्या आसवाने,
देव पडला थोडा लेकरांच्या विरहाने
व्याकूळ लेमन घेण्या विठूची गाठ, तूच सांग रे बाबा कशी झाली आपल्या मायलेकरांची ताटातुट…
करुनी विठ्ठल नामाचा घोष |
भक्तिभावाने जोडूनी कर |
नतमस्तक होऊनी चरणी |
करितो नमन एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडूनिया कर फुले मन
तोच भासे दाता तोची मातापिता
विसर जगाचा सर्वकाळ..
विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हारे चिंता व्यथा क्षणार्धात…
सोड-अहंकार, सोड तु संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून…
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल |
करावा विठ्ठल जीवभाव ||
येणे सोसे मन जाले हावभरे |
परती माघारे घेत नाही ||
बंधना पासुनी उकलल्या गाठी |
देता आली मिठी सावकाश ||
तुका म्हणे देह भरिला विठ्ठल |
कामक्रोध केले घर रिते ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहीन श्री मुख आवडीने
विठ्ठल माझा ध्यास
विठ्ठल माझा श्वास
विठ्ठल माझा भास
विठ्ठल माझा आभास
साऱ्या भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवरू आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
हरी ओम विठ्ठला..कोणे कोठे दिघेला..
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.
<
p style=”text-align: center;”>