Quotes on Jeevan in Marathi | Good lines on life in Marathi
आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…!!
तुम्ही दुसऱ्यांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दु:ख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटळ नियम आहे.
स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं
कधीही चांगलं.
पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरे स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.
भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला
रोग आहे.
नाही हा शब्द
तुम्हाला ऐकू येत नाही
तोपर्यंत सगळे काही
शक्य आहे.
लक्षात ठेवा
लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार करतात,
मावळत्या नाही.
बोलून
विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी
विचार केलेला बरा.
काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो
अनुभव.
सर्व गोष्टींना पुरून उरणारी
गोष्ट ती म्हणजे कष्ट आणि फक्त कष्ट.
वेळ हे तुमच्या आयुष्याचे नाणी आहे,
त्याचे मूल्य समजून आपण याचा
सर्वोत्तम उपयोग कसा करतो
हे आपल्यावर निर्धारित आहे.
माणसाच्या आयुष्यातील संकटं ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
प्रत्येकाशात झालेल्या भेटीतुन
तर प्रत्येकजण आनंदी होतात
परंतु न भेटता दुरून जपण्याला
आयुष्य म्हणतात.
पायातून काटा निघाला की
चालायला मजा येते तसा,
मनातून अहंकार निघाला की
आयुष्य जगायला मजा येते.
रांगोळी ही पुसली जाणार आहे
हे माहीत असून देखील
आपण ती अतिशय सुबक,
रेखीव व सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो,
तसच आपलं आयुष्य हे
कधीतरी संपणार आहे
ते अधिक सुंदर आणि
सुंदर जगण्याचा प्रयत्न करा!