Tukaram Maharaj Quotes in Marathi तुकाराम महाराज सुविचार
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा ||
ऐरावती रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार ||
ज्याचे अंगी मोठेपण | त्या यातना कठीण ||
तुका म्हणे जाण | व्हावे लहानांनी लहान ||
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला करावी लागत नाही
सुख पाहता जवा
पाढे दुःख पर्वताएवढे
असाध्य ते साध्य
करिता सयास!
कारण अभ्यास
तुका म्हणे!!
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ||
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन |
शब्द वाटू धन जनलोका ||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्दचि गौरव पूजा करू ||
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण
जे का रंजले गांजले
त्यांसी म्हणे जो आपुले!!
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा!!
धीर तो कारण
सहाय्य होतो नारायण
प्रस्तापित पढीक विद्वान हे
ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत
हेचि थोर आवडते देवा | संकल्पावी माया संसाराची ||
ठेविले अनंते तैसेची रहावे | चित्ती असू द्यावे समाधान ||
वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ | भोगणे ते मूळ संचिताचे ||
तुका म्हणे घालू तयावरी भार | वाहू हा संसार देवापाशी ||
दया तिचे नाव !
अहंकाराचे जाव जव!!
लोक म्हणती मज देव हा तो अधर्म उपाव|
आता कळेल ते करी|
सीस तुझे हाती सुरी अधिकार नाही|
पूजा करिती तैसा काही|
मन जाणे पापा|
||तुका म्हणे माय बाप||
आनंदाचे डोही
आनंद तरंग |
आनंदाचे अंग
आनंदाचे ||
अखंड संत निंदि |
ऐसी दुर्जनाची बुद्धी ||
काय म्हणावे तयासी |
तो केवळ पामरासी ||
जो सारे रामनामा |
त्यासी म्हणे रिकामा ||
तीर्थव्रत करी |
यासी म्हणती भिकारी ||
तुका म्हणे विंचाची नांगी |
तैसा दुर्जन सर्वांगी ||
जनी सर्व सुखी असा कोण आहे
विचारे मना तुचि शोधूनी पाहे
मना त्याचि रे पूर्वतसंचित केले
त्या सारखे भोगणे प्राप्त झाले