Marathi status on mother | mothers day Marathi quotes
मृत्यु अनेक मार्गांनी येतो.. परंतु जन्मासाठी एकमेव मार्ग म्हणजेच
आई
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन खाणारे पाच असतात तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे आई.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई मायेचा पाझर ….. ती जीवनाचा आधार…. तिच प्रेमाचे आगर…. तिच्याविना नाही संसार…. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
!! आईच्या !! गळ्याभोवती तिच्या पिल्लाने मारलेली मिठी हा तिच्यासाठी नेकलेस पेक्षाही मोठा दागिणा आहे
हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फिटणार नाही..
आई लाख चुका होतील मजकडून तुझं समजावणं मिटणार नाही.
मातृदिनाच्या खास शुभेच्छा!
लव यू आई
या जगात आपल्यावर निस्वार्थ प्रेम फक्त आपली आईच करू शकते
तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
उज्ज्वल भविष्यासाठी जिने केला रात्रीचा दिवस, त्या माऊलीसाठी साजरा करूया मातृदिनाचा हा सुंदर दिवस
मातृदिनाच्या शुभेच्छा
आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy Mother Day
आई
म्हणजे
मंदिराचा उंच कळस
अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे
वाळवंटात प्यावं अस थंड पाणी
कौसल्येविण राम न झाला, देवकीपोटी कृष्ण जन्मला शिवराजाचे चरित्र घडवी माय जिजाबाई नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे थोर पुरुष तो ठरून तियेचा होई उतराई – ग. दि. माडगूळकर –
मातृदिनाच्या शुभेच्छा!
देव जगात सगळीकडे राहू शकत नाही म्हणून देवाने प्रत्येकाला आई दिली.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुलगी, बहिण, पत्नी, आई या भूमिका निभावताना तुझे संपूर्ण आयुष्य निघून जाई अशा माऊलीचे वर्णन करू कसे जिचे रुप दिसे ठायी ठायी
मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा
‘आई नावाची वाटते देवालाही नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई!’ – म. भा. चव्हाण
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई,
किती ते तुझं निस्वार्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी, कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी. हॅप्पी मधर्स डे
आई असतो एक धागा वातीला उजेड दावणारी समईतली जागा, घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं राज – फ. मु. शिंदे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !