Savitribai fule Quotes in marathi सावित्रीबाई फुले विचार कोट्स मराठी
स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणा-या, पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!
अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचवले, चूल आणि मूल यापलिकडे ही जग हे ज्यांनी दाखविले.त्या शिक्षणवर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
उद्धारण्या भारतमातेच्या लेकी माय दिली तू सुखाला आहुती तुझ्याचमुळे ग तेवत आहेत सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती
जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते – सावित्रीबाई फुले
पहिल्या महिला शिक्षिका…
सावित्रीबाई ज्योतिराव फुले.
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन….
आजकाल मुलीच सर्व क्षेत्रात आघाडीवर
मग आपण का अजून बुरस्टल्या विचारांवर
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आम्ही सावित्रीच्या लेकी
कायमच वागतो विवेकी
आकाश चिडू आमच्यावर एकाएकी
आम्हीच बनतो की तुमच्यासाठी कायम सखी
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझ्या येण्याने जग हे झंकारले
या संस्काराने जग हे तरले
हे सारे विश्व तुझ्या मुळे बहरले
तूच आहे आदी आणि अंत
सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
सावित्री तू घरोघरी शिक्षणाचे दिवे लावलेस, स्वत:
मात्र ज्योतीप्रमाणे जळून आमचे आयुष्य प्रकाशित
केलेस.
समाजाच्या विरोधाला नाही कधी डगमगलीस,
स्वप्न होते स्त्री शिक्षणाचे मनात जे पूर्ण करण्या
तुझी वाट तू चालत राहिलीस, धन्य ती क्रांतीज्योती
धन्य ती माऊली.
तुझे उपकार फेडणे अशक्य आहे या जन्मात,
क्रांतीज्योती तुझेच प्रतिबिंब आहे आमच्या मनात.