sant gadgebaba quotes in marathi संत गाडगेबाबा यांचे विचार कोट्स
ज्या दारुण करोडपतीचा खाना खराब केला राजपुत्र मारले राजवाडे ओसाड पडले त्या दारूच्या सावलीत उभे राहू नका जे दारू पीतील त्यांचा खाना खराब झाल्याशिवाय राहणार नाही.
अनेक जण म्हणतात पगार पुरत नाही पगार सरतच नाही असे म्हटले पाहिजे ज्या घरात नवरा बायको बुद्धिमान अक्कलवान असतील तिथे पगार सरत नाही शिल्लक पेटीत टाकली पाहिजे.
दान घेण्यासाठी हात पसरू नका दान देण्यासाठी हात पसरा.
माय बाबांनो घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा. मुला मुलींना शिकवा. अंध अपंग अनाथांना यथाशक्ती अन्न वस्त्र दान करा.
कोणी तुम्हाला जात विचारली तू कोण तर मनावर मी माणूस माणसाला जाती दोनच आहेत बाई आणि पुरुष या दोनच जाती आहेत तिसरी जातच नाही.
ज्या घरात देवाचे भजन असेल त्या घराच्या दरवाज्यावर परमेश्वर राखण आहे ज्या घरात निंदा असतील फुकट गप्पा असतील कमी जास्त गोष्टी असतील त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे.
मारवाडी गुजराती ब्राह्मण हे लोक रोज तुपातला शिरा का खातात कारण त्यांच्या घरी जमाखर्च आहे उत्पन्न किती अन्न खर्च किती हे त्यांना माहित आहे आमच्या मराठ्याला तेल्या माळ्या नव्या धोब्याला जमा खर्च समजतच नाही जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारी बोंबलत बसा काटकसर पाहिजे घरी जमाखर्च पाहिजे.
तुमच्या देवाचा देवळा पुरता तरी उजेड पडतो का नाही मग दिवा भिजला मंडळी दर्शनाला आली बापूराव दिवा लावा मग देव कोणी दाखवला दिव्यान दिवा मोठा की देव मोठा दिवा..!
शिक्षण हे
समाज परिवर्तनाचे साधन आहे.
माणसाने माणसाबरोबर
माणसासारखे वागावे
हाच बोध मी ग्रहण केला आहे.
दगड धोंड्यांची पूजा करण्यात
वेळ आणि शक्ती
वाया घालवू नका
माणसाचे खरोखर देव
कोण असतील तर ते
आई बाप.
शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या.
भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ.
गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी.
म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा. हाच आजचा धर्म आहे.