राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी 2023
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निबंध
जाणून घ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे बद्दल
तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत आहेत. यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे हे आहे. त्यांचा जन्म विदर्भा मधील अमरावती जिल्ह्यातील यावली येथे 1909 ला झाला व मृत्यू 1968 मध्ये झाला.
ग्रामगीता सारखा अनमोल ग्रंथ लिहून ग्रामविकासाचा मार्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दाखविला. ग्रामगीता हा आजच्या काळातील अभिनव प्रसिद्ध ग्रंथ होय.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार
राष्ट्रदेवतेच्या योग्यतेसमोर लोकांच्या आपापल्या लाखों देवता मला सूर्यासमोर गणल्या जाणाऱ्या काजव्याप्रमाणे वाटतात, पण प्रत्येक देवतेचे महत्व त्यांच्या त्यांच्या स्थानी विशेष असणे हे एक मनुष्याच्या स्वार्थीपणाचेच द्योतक असते.
मनुष्याने आपल्या सद्विचाराला (विवेकबुद्धीला) व ईश्वराला सदैव भ्याले पाहिजे, परंतु अन्याय आणि दुष्टतेला कधी न भिता हाकून दिले पाहिजे.
आपल्या शत्रूचाही कोणाकडून होत असलेला अयोग्य अपमान सहन करणे वीराचे कार्य नव्हे. शत्रूची अयोग्य फजीती नेत्राने पाहून समाधान मानणे हे नीचाचे काम आहे.
मित्रांनो ! मरणाला आपला अत्यंत प्रिय आणि हितैषी मित्र समजा. जो आपली भेट परमेश्वराशी करुन देण्याला उत्सुक असतो आणि तुच्छ आसक्तीचे बंधन तोडण्यास सुसज्ज असतो.
शस्त्रे घर्षणाने चमकतात आणि शूर संघर्ष प्रसंगानीच चमकत असतो.
मित्रांनो ! आपल्यासमोर जेंव्हा कोणत्याही मनुष्य मात्रात काही कमतरता दिसून येईल, तेंव्हा त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या आणि त्याचा जन्म सफल करा. याच्याएवढे पुण्य सर्व जगात दुसरे नाही.
संत तुकडोजी महाराज अभंग / भजन
चाल; आता तरी धाव….)
मनी नाही भाव, म्हणे देवा ! मला पाव ।
देवा अशानं भेटायचा नाही रे !
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ! ।।धृ0।।
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चांदीचा देव त्याला चोराचं भेव ।
लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ।।१।।
देवाचं देवत्व नाही दगडात ।
देवाचं देवत्व नाही लाकडात ।
सोन्या -चांदीत नाही देदाची मात ।
टेव बाजारचा भाजीपाला नाही रे ! ।।२।।
भाव तिथं देव ही संताची वाणी ।
आचारावाचुन पाहिला का कोणी ?
शब्दाच्या बीलान्ं शांती नाही मनी ।
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ! ।।३।।
देवाच देवत्व आहे ठायी – ठायी ।
मी-तू गेल्यावीन अनुभव नाही ।
तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा भाजीपाला नाही रे ! ।।४।।
तुझे नाम आले ओठी सुर भारावले
अतरंगी बाह्यअंगी मन हरपले रे….॥धृ॥
नको झांज चिपळ्या विणा नको भिन्न राग
झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे…॥1॥
आनंदाचा डोह मन आनंद किनारा
विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे….॥2॥
भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल
स्वःताच्याच सुगंधाची स्वःत लाच भुल रे….॥3॥