Netaji SubhashChandra Bose quotes in marathi नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार
माझ्यावर कितीही संकट अली तरी मी घाबरणार नाही, मी पळून जाणार नाही, मी त्याचा सामना करत पुढे जाईन.
जर आयुष्यात संघर्ष नसेल आणि कोणत्याही भीतीचा सामना करण्याची गरज पडत नसेल, तर जीवन जगण्याची मज्जाच संपते.
आयुष्यातील प्रगतीचा हेतू असा आहे की शंका उद्भवली पाहिजे आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्याची प्रक्रिया चालूच राहिली पाहिजे.
आपल्या रक्ताने आपल्या स्वातंत्र्याचा मोबदला देण्याचे आपले कर्तव्य आहे.
आपल्या बलिदानाने आणि कष्टाने आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आपल्यात असले पाहिजे.
भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे.डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.
कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.
अन्यायाशी तडजोड करणे, हे सर्वात मोठे पाप आहे.
आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.
तू मला रक्त दे, मी तुला स्वातंत्र्य देईन!