ॲमेझॉन ॲप मधून शॉपिंग कसे करायचे?
मित्रांनो या पोस्ट मध्ये तुम्ही ॲमेझॉन ऍप मध्ये कोणतीही वस्तू खरेदी कशी करायची हे जाणून घेणार आहात,
तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल वर ऍप केला नसेल तर ॲप इंस्टॉल करावे लागेल, त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकचा वापर करू शकता.
ॲप्प डाउनलोड/इंस्टॉल झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा अकाऊंट बनवावा लागेल म्हणजे साइन अप करावं लागेल. तुम्हाला तेथे तुमची ईमेल आयडी/मोबाईल फोन नंबर आणि पासवर्ड सेट करून तुमचं अकाऊंट सुरू करायचा आहे ज्याने तुम्ही कोठेही मोबाईल असो किंवा कॉम्प्युटर ॲमेझॉन च्या वेबसाईट वर लॉग इन करू शकाल.
त्यानंतर ॲमेझॉन वर कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी लोगोच्या खाली सर्च बार असेल तेथे तुम्हाला जी वस्तू घ्यायची आहे त्या वस्तूचे नाव इंग्रजीमध्ये लिहायचं आहे, मग तुम्हाला त्या वस्तूची सूची दर्शविले जाईल त्यामधून तुम्हाला हवी असलेली वस्तू निवडायची आहे,जर तुम्हाला स्वस्त वस्तू निवडायची असेल तर तिथे असलेल्या फिल्टर या ऑप्शन चा वापर करावा लागेल त्या फिल्टर ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तेथे शोर्ट बाय sort by हा एक ऑप्शन दिसेल आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अजून एक ऑप्शन दिसेल प्राईस low to high ह्याच्या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात स्वस्त असलेली वस्तू आधी दिसते त्यामुळे तुमची वस्तू चांगले निवडून किंमत बघू शकता आणि पसंत पडल्यास Buy Now वर क्लिक करून खरेदी करण्यासाठी समोर जाऊ शकता किंवा add to cart त्यावर क्लिक करून ती वस्तू तुमच्या cart मध्ये ऍड करू शकता.
तुम्ही तुम्हाला हवी असलेली वस्तू तुमच्या cart मध्ये add केल्यानंतर ती वस्तू खरेदी करण्यासाठी buy now वर क्लिक करा, तुम्ही तुमचा ऍड्रेस डिटेल्स/सध्याचा पत्ता तिथे टाकायचा आहे, पत्ता टाकून झाल्यावर डिलिव्हर टू धीस अॅड्रेस वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तुमचे सगळे/total किंमत दाखवले जाईल, त्यानंतर place order/प्लेस ऑर्डर वर क्लिक करा, तुम्हाला तुमचे पेमेंट/payment option दाखवले जातील, तुम्हाला तुमचे पेमेंट कसे करायचे आहे हे निवडावे लागेल, तुम्ही हवी ती पेमेंट पद्धती निवडू शकता जर तुम्हाला ऑनलाईन व्यवहार करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता कधी कधी ह्यावर ऑफर्स सुधा असतात आणि होम डिलिव्हरी करायची असेल तर प्रसिद्ध deliver to home वर क्लिक करून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता.
ऑर्डर place केल्यानंतर तुम्हाला कन्फनर्मेशन ई-मेल/मेसेज येईल. तो सांगेल की तुम्हाला तुमचा पार्सल मिळायला किती वेळ लागेल आणि तुम्ही तो पार्सल कुठपर्यंत पोहोचला हे ट्रॅक पण करू शकाल आणि ज्या दिवशी तो प्रॉडक्ट तुमच्या घरी पोहचणार असेल त्या दिवशी डिलिव्हरी बॉय तुम्हाला कॉल करेल आणि तुमच्या घरी येऊन प्रॉडक्ट देऊन पैसे घेऊन परत जाईल जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेसे दिले तर तुम्हाला तो घरी पैसे मागणार नाही.
अशाप्रकारे तुम्ही तुमचं वस्तू घेऊ शकता इथपर्यंत वाचलं धन्यवाद तर तुम्हाला अजून काही वाचायचे असेल तर खाली दिलेल्या तुम्ही करू शकता किंवा नवीन आमच्या पोस्ट नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या साईटला सबस्क्राईब करू शकता,
धन्यवाद.