CPU information in Marathi | सिपियु बद्दल माहिती
सिस्टम युनिट ( system unit)
संगणक मधील सिस्टम युनिट हे बॉक्स सारखे दिसणारे असते. संगणकाला input उपकरणाद्वारे input मिळते, मेमरी मधे तो input साठवतो, त्यावरून system युनिट मधे क्रिया करतो आणि output उपकरणाद्वारे तो output दाखवतो. ही संपूर्ण क्रिया संगणकाच्या system युनिट मधे होते. सर्व डेटा साठवतो व त्यावरून क्रिया करण्याचे काम सेंट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा सिपियू मधे होते. त्याला सिस्टम युनिट किंवा microprocessor असेही म्हणतात.
प्रोसेसर चा वेग हा साधारणपणे megahertz (MHz) मधे किंवा gigahertz (GHz) मधे मोजतात. संगणकाच्या परिभाषेत त्याला घड्याळाचा वेळ किंवा क्लॉक स्पीड असे म्हणतात. संगणकाची कार्यक्षमता त्याच्या वेगावर आधारित असते.
सर्वसाधारणपणे, प्रोसेसरचा तपशील घड्याळ्याच्या वेगाच्या सधनेत, L2 कॅश मेमोरि आकारात आणि फ्रंट साईड बस (FSB) वेगात दिला जातो, L2 कॅश मेमोरि ही सिपियू चीपमध्ये तिला क्रिया करण्यासाठी साठवणुकीसाठी जागा असते. कॅश मेमोरि ही सूचना साठवते आणि नन्तर प्रोसेसर कडे पाठवते FSB हा मार्ग असून त्याद्वारे सिपियू हे इलेक्ट्रॉनिक माहिती, रँडम access मेमोरि (RAM) आणि इतर चीपसेट कडे पाठवतो. सिस्टम युनिट मधे अनेक भाग असतात, उदा. मदरबोर्ड, हार्ड डिस्क ड्रायव आणि फ्लॉपी डिस्क ड्रायव.
यामधे तीन मुख्य पार्ट असतात ते म्हणजे,
- कंट्रोल युनिट
- अरिथमेटीक लॉजिक युनिट
- मेमरी युनिट
कंट्रोल युनिट
कंट्रोल युनिट हे संगणकाच्या इतरही सर्व भागाचे कार्य नियंत्रित करते. ते अरिथमेटीक लॉजिक युनिट ला कोणते कार्य करायचे त्याच्या सूचना देते. जरी ते डेटा vr कार्य करीत नसले तरी ते इतर सर्व भागांसाठी मध्यवर्ती चेता संस्थे सारखे काम करते.
अरिथमेटीक लॉजिक युनिट
अरिथमेटीक लॉजिक युनिट हे सिपियू चा भाग असून यामध्ये लॉजिकल आणि गणितीय क्रिया केले जातात. अरिथमेटीक लॉजिक युनिट हे नियंत्रण भागाकडून येणार्या सूचनांना प्रतिसाद देते. एकदा डेटा वर क्रिया झाली की त्याचे उत्तर मेमरी भागाकडे पाठविले जाते व तेथून ते output उपकरणाद्वारे दाखविले जाते.
मेमरी युनिट
मेमरी युनिट हे संगणकाचा भाग असून ते प्रक्रिया करण्यासाठी डेटा आणि सूचना धारण करते. त्याचा उपयोग प्रक्रिया केलेली माहिती धारण करण्यासाठी होतो.