internet marathi meaning | internet meaning in marathi
इंटरनेटचा शब्दशः अर्थ होतो आंतरजाल.
इंटरनेट चा वापर कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल किंवा इतर डिजिटल डिव्हाइसेसवर केला जातो. इंटरनेट मध्ये वेगवेगळ्या वेबसाइट्स आणि ब्लॉगचा समावेश असतो. त्या वेबसाइट आणि ब्लॉग्स मध्ये वेगवेगळ्या फाइली असतात त्यामध्ये वेगवेगळी माहिती साठवलेली असते.
तेथील वेबसाईट आणि ब्लॉग त्याच्या संकेतस्थळणे ओळखले जातात याला इंग्रजीमध्ये युआरएल म्हणतात. यु आर एल चा फुल फॉर्म होतो युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. प्रत्येक वेबसाईटची युआरएल वेगवेगळी असते. प्रत्येक युआरएलला वेगवेगळ्या डोमेन नेम असते. ते युआरएल एखाद्या डोमेन नेम ने ओळखले जाते.
कोणत्याही संकेतस्थळाला भेट द्या साठी आधी त्याची यु आर एल एखाद्या कम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल मध्ये असणाऱ्या ब्राउझर मध्ये इंटर करावी लागते त्याच्यानंतर त्याचा वेबपेज उघडते आणि तेथून तुम्ही वेगवेगळे पेजेस ब्राऊज करू शकता.
तेथे तुम्हाला माहिती वाचायला मिळू शकते फोटो बघायला मिळू शकतात गाणे ऐकाला मिळू शकते किंवा व्हिडिओ पाहु शकतात. तुम्हाला त्यातील फाइल्स डाउनलोड करायचे असेल तर तेही देखील करू शकता. तेथे असणाऱ्या डाउनलोड बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी फाइल हवी आहे ती फाईल तुमच्या डिवाइस मध्ये जसे की कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल मध्ये सेव होऊन जाईल.