adsense meaning in marathi | एडसेंस अप्रूवल कसे मिळवले?
तुम्ही या पोस्टमध्ये या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहात.
प्र. आपले ब्लॉग किंवा वेबसाईट एडसेंस कडून अप्रूव कसे करून घ्यायचे ?
सर्व प्रथम तुम्ही हे जाणून घ्या की एडसेंस म्हणजे काय ?
एडसेंस काय आहे ?
गूगल एडसेंस हे जाहीरात प्लेसमेंट कंपनी आहे. याच्यामुळे कोणीही त्यांच्या वेबसाइटवर किंवा यूट्यूब चॅनल वरती गूगल जाहिराती (उ. मजकूर, फोटो, व्हिडिओ ई.) दर्शवल्याने कोणी इंटरनेट युजर्स अॅडवर क्लिक केल्यास वेबसाइट मालक जाहिरातीच्या दरानुसार कमाई करु शकतो. त्याआधी प्रत्येक ब्लॉग किंवा वेबसाईट प्रकाशकाला गुगल एडसेंस कडून त्याच्या साईट वर जाहिराती दर्शवण्यासाठी मान्यता मिळवावी लागते, त्याच्यासाठी काही अटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात. ह्या अटी ब्लॉग/वेबसाईट साठी वेगळ्या आणि यूट्यूब चॅनल साठी वेगळ्या असतात.
ब्लॉग/वेबसाईट ला एडसेंस अप्रुवलसाठी अटी.
१. वयमर्यादा : तुमचे वय किमान १८ वर्षे, पेक्षा जास्त असायला पाहिजे.
२. साईट : तुमच्या स्वतःच्या मालकीचा ब्लॉग किंवा वेबसाईट असणे आवश्यक आहे, ज्याचे script तुम्हाला एडिट करता आले पाहिजे.
३. डोमेन : नवीन डोमेन असल्यास १ महिना पूर्ण झाला असावा.
४. थीम : थीम किंवा टेम्प्लेट रिस्पॉन्सीव असायला पाहिजे.
५. कंटेंट : तुम्ही स्वतः लिहिलेली सामग्री ही जास्त प्रमाणात पण दुसऱ्यांपेक्षा वेगळी क्वालिटी असावी.
६. ट्रॅफिक : किमान थोडासा तरी गुगल सर्च कडून ट्रॅफिक असावा.
७. पेज : कमीत कमी तीन, चार पान दिशानिर्देशनानुसर असावेत. उदा. संपर्क, ई.
टीप : कॉपी करू नका.
यूट्यूब साठी,
जर तुमचा यूट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला
एका वर्षभरात
१. चार हजार घंटे (४०००तास) वॉच टाईम म्हणजे पाहण्याचा कालावधी,
२. (१k) हजार सबसक्राईबर असणे आवश्यक आहे
तेव्हाच तुम्हाला यूट्यूबच्या पार्टनर प्रोग्राम मधे भागीदारी किंवा अड्सेंन्सची मंजुरी मिळेल.
हे सुध्दा वाचा,