Gudipadawa wishes in marathi गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान.
नूतन वर्षाभिनंदन!
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
You might also like:
- गणपती आरती मराठी Ganapati Aarati
- यशवंतराव चव्हाण यांचे विचार Yashwantrao Chavan Quotes in marathi
- हास्य विनोद जोक्स चुटकुले मराठी | hasya vinod marathi chutkule
- लक्ष्मी पूजन शुभेच्छा 2023 Lakshmi Pujan Vishesh Lakshmi puja status Lakshmi Pujan quotes Lakshmi Pujan shayari Lakshmi Pujan caption Lakshmi Pujan SMS Lakshmi Pujan text Marathi
- internet marathi meaning | internet meaning in marathi