good thoughts in marathi सुविचार मराठी छोटे सुविचार मराठी सुंदर सुविचार मराठी
संधी तुमचा दरवाजा ठोठावत असते पण आपल्याला कळले पाहिजे की हीच संधी आहे. हीचा आपण लाभ घेतला पाहिजे.
आयुष्य पूर्ण शून्य झाल तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे.
अशक्य असे या जगात काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे.
ज्ञानी, सद्गुणी व्यक्ती दुसऱ्या कोणाशीही कोणत्याही बाबतीत स्पर्धा करायला जात नाही.
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा, परंतु कोणत्याही कारणास्तव. सत्याचा त्याग करू नये.
चांगले काम करताना बदनामी झाली तर घाबरू नये. कारण बदनामीची भीती त्यांनाच असते ज्यांच्यामध्ये इतरांसाठी काम करण्याची हिंमत नसते.
तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करा आणि नेहमी मोठी स्वप्ने बघा.काम आणि आपले आयुष्य यात संतुलन राखण्याचे कौशल्य मिळवा.
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेले पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं.
आपल्या कामावर पूर्णपणे विश्वास ठेवा व देवावर श्रद्धा ठेवा म्हणजे कितीही कठीण वेळ आली तरी त्यामधून बाहेर पडण्याचा रस्ता निश्चित मिळेल.
माणसाच्या मुखात गोडवा, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असेल तर त्याच्या हातून चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात.
जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारी व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.
सौंदर्य-सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुद्ध अंतःकरणाने गुणा, परनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा, हेच आपल्या सुखी जीवनाचे गणित आहे.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.
कोणत्याही व्यक्तीजवळ वादविवाद,भांडण झाले असता आपल्याला सुखी व्हायचे असेल तर आपणच माघार घ्यावी.
विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे. विद्या म्हणजे कामधेनू आहे. विद्येवाचून जीवन फुकट आहे. विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.
जिंकायची मजा तेव्हाच असते, जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात.
जगातील सर्व विचारी डोक्यांपेक्षा एक प्रेमळ अंतकरण श्रेष्ठ असते.
काहीही आपलं नव्हतं, काहीही आपलं नाही आणि काहीही आपलं रहाणार नाही हे आपण स्वीकारले तर जीवन जगणे सोपे होते.
आलेले अपयश विसरा,येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा.
व्याख्यात्याच्या समोर श्रोत्यांची संख्या कमी असली तरी चालेल पण त्या श्रोत्यांना व्याख्यानामध्ये मनापासून रस असला पाहिजे.
कुणी आपलं वाईट केलं की त्याचाही वाईट व्हावं ही भावना आपल्याला संपवून टाकते.यातून मुक्त होऊन स्वतःला शांत करण्याचा मार्ग एकच,क्षमाशील राहणं.
जे कसलीच अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान, कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही.
प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा धरू नका.
मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.
ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे.
ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून थकायचा आणि रूसायचा अधिकार संपतो.
नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक रहा.कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा,प्रामाणिक माणसाच्या पाठीशी देव असतो.
लोकांचे कान भरून किंवा काड्या करून तुमचं अस्तित्व क्षणभर टिकतं. आयुष्यभर जगावर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते.
ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधीच अयशस्वी होत नाही.स्वयंशिस्त हा महत्त्वाचा गुण आहे याची सुरुवात तिथूनच होते.
पतंगासारखी माणसाची स्थिती असते. शीलाची दोरी जोपर्यंत मजबूत आहे, तोवर दिमाखाने वरवर जावे, अनंतात स्वैर भरारी मारून सूर्यबिंबाला स्पर्श करण्याची उमेद धरावी, पण ती दोरी तुटली, तर त्याचा अधःपात कुठल्यातरी खातेयात होणार हे निश्चित!
मोहाचे पाश नेहमीच पराक्रमाला बांध घालीत असतात.