Quotes on Truth in Marathi | मराठीतील सत्य विचार
सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचेच आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही
व्यक्तीचं मन मोठं आहे आणि गरज छोटीशी आहे अर्थात गरजेपुरती लागणारी गोष्ट कमी पैशात मिळून जातील आणि मना पुरती लागणारी गोष्ट स्वतःला विकुन नाही मिळत नाही
माणूस इतरांपेक्षा स्वतःला सगळ्यात जास्त अंधारात ठेवतो आणि गंमत म्हणजे त्याला त्याची कल्पनाही नसते
आयुष्यातले काही क्षण आहे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतः होतो
दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात
भरोसा श्वासावर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो
समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो
समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत असतो पण समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो
काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश सुविचार आणि सल्ला फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणल्या करताच असतात
सुख आहे सगळ्यांजवळ पण अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही
नुसतच आपलं म्हणून नाही चालत आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं
ज्या व्यक्तीच्या आपण सर्वात जास्त जवळ असतो काळजी करतो तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते
जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा
प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही तर तोच रक्तातच असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो
आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतील सांगता येत नाही
सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही श्रेष्ठ कला आहे
ह्या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणार नाही आपल्या दुःखात पण काही असंच असतं दुःख सुद्धा काही काळासाठी जास्त आपण फक्त हिम्मत ठेवली पाहिजे
आयुष्यात कधीकधी असं वाटतं काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटली नसती तर बर झाल असतं
एकदा वेळ निघून गेली की सर्व काही वेगळं जाता मग किती पश्चाताप करून उपयोग नसतो
व्यक्त होणं महत्त्वाचं मनावर दगड आणि न मिळालेल्या उत्तरात ओझं घेऊन आयुष्य काढणं जमणार आहे का?