मन vs बुद्धी
मन तृप्त कधीच होत नाही. एकदा का मनाला चटक लागली की मग सतत करतो. वारंवार चिंतन केल्याने आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण नाही झाली की राग येतो. रागामुळे वाईट विचार व अविचाराने पूर्णपणे विचार करून चांगला निर्णय घेता येत नाही म्हणजे बुद्धीची क्षमता कमी होते बुद्धीची क्षमता कमी झाली की माणसाचा सर्वनाश होतो.
यावरून आपल्याला हे समजायला पाहिजे की मनाला अशा गोष्टीची चव लागू द्यायची नाही आहे जाने दुष्परिणाम होतो ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या समतेनुसार कराव्या किंवा अजिबात न केल्याने खूप जास्त प्रमाणात केल्याने दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.
मनाने कोणत्या गोष्टीची चव घ्यायची किंवा नाही आहे हे बुद्धीने नियंत्रित करता येते. त्या गोष्टीच्या माहितीवरून त्याचा परिणाम काय होईल चांगला की वाईट हे आपल्याला ठरवता येते.
वाईट गोष्टी पासून दूर राहून चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत. मनाला वाईट गोष्टीची आठवण आली की त्याला चांगल्या गोष्टीवर लावावे अशा प्रकारे वाईट गोष्ट विसरू शकतो.
वाईट गोष्ट आपल्या समोर आली की तिला दुर्लक्ष करणे चांगल्या गोष्टी करण्यासाठी आवश्यक आहे.
चांगल्या सवयी जोपासाव्यात, वेळेचे नियोजन करावे, काय करायचे आहे याचा आराखडा तयार करावा व मन प्रसन्न ठेवून आपल्या आवडते काम करत राहावे.
महत्त्वाच्या गोष्टीबद्दल ज्ञान घेत राहावे आणि असे सत्य जाणल्याने मनाला शांती मिळते.