happy anniversary wishes in marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
happy marriage anniversary मराठी happy anniversary wishes in marathi anniversary wishes for husband in marathi husband anniversary wishes in marathi
हा तुमच्या आयुष्यातील
सर्वात आनंदाचा दिवस आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
एका अद्भुत जोडप्याला
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचे एकमेकांवरील प्रेम आणि
वचनबद्धता आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे,
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती,
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं,
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा,
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह,
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
एनिवर्सरी जाईल-येईल,
पण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव.
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.